रावेर तालुक्यात सावदा शहर आहे.या शहरात साळीबाग परिसरात राहणारा अजय सुधाकर फाटके वय ३८ हा तरुण फैजपूर शहरात कापड दुकानात कामाला जात आहे असे सांगून घरून निघाला होता आणि बेपत्ता झाला होता.याबाबत सावदा पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.तर या तरुणाची मोटरसायकल भुसावळ जवळील तापी नदी पुलावर आढळली होती व त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले होते.दरम्यान त्याचा मृतदेह बुधवारी बोरावल जवळील तापी नदीत मिळून आला आहे.या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे