रुकडी (ता. हातकणंगले) येथे बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळताना आठ जणांना रंगेहाथ पकडण्यात हातकणंगले पोलिसांना यश आले. या कारवाईत सुमारे २ लाख ८० हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री 11 वाजता करण्यात आली. गुन्ह्याची फिर्याद पो.कॉ. विक्रम हिंदुराव पाटील (ब.नं. ९७६) यांनी दिली