सालबर्डी या गावात जयस्वाल लॉन्स आहे.या जयस्वाल लॉन्स मध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसह गेली होती. तेथे कुंदन सुनील महाले व उदय नवलसिंग राठोड या दोघांनी येऊन. अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला. विचारणा केल्यास गेले असता कुंदन महाले याने माझे नाव घेतले तर कापून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.