पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील दाखल घरफोडी, दरोड्यासारखे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपणीय माहिती मिळाली होती त्यावरून आज सकाळी साडेपाच वाजतालोहा शिवारात जाऊन आरोपी सदाम घोडके व युनुस कुरेशी यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी पाच गुन्हे कबूल केले यासह १ लाख ३७ हजार ५०० चा मुद्देमाल ही पोलीसांनी आज जप्त केला