पूर्णा तालुक्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर्णा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक बंद तर काही ठिकाणी जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ. पूर्ण शहरातील रेल्वे भुयारी महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्ग काढण्याची वेळ आली तर तालुक्यातील माटेगाव आहेरवाडी नावकी एरंडेश्वर कातनेश्वर भागात सर्वत्र पाणी झाला माटेगाव जवळील पुलावर पाणी आल्यामुळे पूर्ण झिरो फाटा वाहतूकही काही काळ बंद झाली.