दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिस स्टेशन उमरी हद्दितील कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था सिंधी ता उमरी येथे आरोपीतांनी तलवारीचा धाक दाखवून बॅंकेतील नगदी रक्कम जबरीने चोरून नेली होती याप्रकरणी उमरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील उर्वरित तीन वर्षांपासून फरार आरोपी अरबाज खान शहबाज खान यास स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीसांनी गुप्त बातमीदाच्या माहिती वरून अण्णा भाऊ साठे चौक येथुन आज दुपारी ताब्यात घेऊन उमरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती.