लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथील सविता प्रकाश खेडीकर वय 49 वर्षे हे त्यांचे पती व मुलासह आपल्या घराला कुलूप लावून देवदर्शनाकरिता नाशिक येथे गेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी सुना मोका पाहून त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेले मंगळसूत्र, चंपला कंटी, सोन्याचे कानातील झुमके, नथ व सोन्याचे विविध दागिने असा एकूण किंमत 7 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे.