पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथील पैनगंगा नदीकाठी सुरू असलेल्या जुगारावर दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे, या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून आठ आरोपींना अटक केली आहे व कारवाईत एकूण एक लाख 83 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.