रविवार हा तर खरा सुट्टीचा दिवस, या दिवशी महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक असते. त्यादरम्यान चालता चालता इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहरातील ढेबेवाडी फाट्यानजिकच्या शिवछावा चौकात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चौकातच द बर्निंग बाईकचा थरार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.