वरोरा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ७५ मि.मि.च्या वर पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा तालुक्यातील नदी,नाल्याला पूर आल्याने नाल्या काठावरील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील कापूस आणि सोयाबीन हे पिके पाण्याखाली आल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. तरी सदर परिसरात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आज दि 2 सप्टेंबर ला 12 वाजता कृउबाचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे यांनी शासनाकडे केली आहे.