रेल्वे स्टेशन परिसरात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत आज गुरुवारी अंबाजोगाईतील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समाज बांधवांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "अशा प्रकारच्या नराधमांनी समाजात राहण्याचा अधिकार नाही.