लातूर -चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा ते चाकूर दरम्यान तिरू नदीवरील पुलाखाली मोठ्या ट्रॉली सुटकेसमध्ये एका तरुणीचे प्रेत आढळून आले होते. मृतदेहीचा चेहरा विद्रूप केल्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले होते. घटनास्थळी ओळख पटेल असा कोणताही पुरावा न मिळाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, लातूर पोलिसांनी शिताफीने तपास करून हे गूढ उकलले असून, पतीच या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.