लातूर : शहरासह जिल्ह्यातील कॉफी शॉप व कॅफेंबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 20 जून 2023 रोजी नियमावली जारी केली होती. या नियमांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे, पारदर्शक काचेचे दरवाजे, स्पष्ट बैठक व्यवस्था, बंदिस्त कंपार्टमेंट्सना बंदी, भेट नोंदवही ठेवणे तसेच ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन यासारख्या अटी घालण्यात आल्या होत्या.मात्र या नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कारवाईचे आदेश दिले.