कोल्हापूर शहरातील संभाजीनगर व मिरजकर तिकटी परिसरात आज पाण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गणपती ठेवत रास्ता रोको आंदोलन केले आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने गेल्या चार दिवसांपासून नागरिक हैराण आहेत. दरम्यान, गणपतीच्या सणाला पाणी नाही नळाला अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले आहे.