गेल्या अनेक निवडणुकीत चर्चेचा विषय असलेला साताऱ्यातील आयटी पार्कचा विषय आता मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून पुणे बंगळुरू आशियाई महामार्गालगत लिंबखिंड आणि नागेवाडी परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांना माहिती दिली.