औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा सिद्धेश्वर देवळा या भागात सध्या सोयाबीनच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी फवारणी करून हैराण झाला आहे आधीच अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले आहे आता सोयाबीन वर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे महागड्या औषधाची फवारणी करूनही आळी जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे दरम्यान अंजनवाडा भागात दिनांक २६ ऑगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान शेतकरी पिकाची फवारणी करताना पाहावयास मिळाले आहे