यावल शहरातून चितोडा जाणाऱ्या रस्त्यावर श्री बालाजी ऍग्रो व चिंतामणी इंडस्ट्रीज आहे. तेजस गडे यांच्या या इंडस्ट्रीज मधून अज्ञात चोरट्याने बॅटरी इन्वर्टर डीव्हीआर असा एकूण २६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल चोरी केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.