माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील भानुदास कांबळे या व्यक्तीचा मृतदेह माजलगाव धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी धरण परिसरात काही नागरिक फिरण्यासाठी आले असता त्यांना पाण्यावर एक मृतदेह दिसून आला. तात्काळ त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच माजलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवून तो सावरगाव येथील भानुदास कांबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.