परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना तिला उचलले.