अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर १ आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला या प्रकरणी आता राजकीय पक्षाने सुद्धा दखल घेण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेस पक्षाचे आमदार साजिद खान पठाण यांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की मुलीवर अत्याचार करणारा हा कोणत्याही जाती धर्माचा किंवा पक्षाचा असो त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही पोलिसांसोबत आहोत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ही आमदार साजिद खान पठाण यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.