लातूर-लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी शिरले असून काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसून शेतीचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.