वरझडी गावात खड्यात चारा फेकलाचा जाब विचारल्याने एकाला मारहाण. काळू शंकर पाटील वय 45 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या खड्यात गावातीलच तीन जणांनी चारा फेकला त्याचा जाब विचारण्यासाठी मी गेलो असता या तिघांनी मला वाईट वाईट शिवी ऍड करत लाकडी दांडक्याने मला डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. व तसेच मला जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. यावरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.