बीड तालुक्यातील पालवण गावात एका शिवसेना कार्यकर्त्याच्या घरावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना कार्यकर्ते विलास भारत मस्के (वय ३२, रा. पालवण) यांना घराबाहेर बोलावून काही जणांनी घातक शस्त्रांनी मारहाण केली. या हल्ल्यात मस्के गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच परिसरात मोठी खळबळ उडाली. विलास मस्के यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात निखिल मस्के याच्यासह पाच जणांविरोध