वर्धा जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे.अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली आहे तर काहीच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. काही भागात घरांचे नुकसान सुद्धा झाले आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी वर्धा तालुक्यातील आंजी व सेलू तालुक्यातील मदनी या गावांची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. पाहणी केलेल्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था पवसामुळे बिकट झाली आहे त्यांना प्रशासनकडून लवकर लवकर मदत देणार असल्याच य