औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील अर्जुन नामदेव काळे वय २१ हे दिनांक ३ सप्टेंबर बुधवार रोजी कामानिमित्त औंढा नागनाथ येथे आले होते कामे आटोपून रात्री १० वाजता गावाकडे जाताना बस स्थानकाजवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.याप्रकरणी शितल काळे यांनी औंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्र.एमएच ३०एव्ही१२६३च्या चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिनांक ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री सव्वानव दरम्यान गुन्हा दाखल केला