भंडारा तालुक्यातील मौजा दवडीपार बेला येथील शेतकऱ्यांची गोसे पुनर्वसन विभागा मार्फत बाधित वाढीव शेत जमिनीचे संपादनाचे काम सुरू आहे. हा प्रश्न खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने मार्गी लावण्यात आला होता. बहुतांश बाधित शेतकऱ्यांना थेट खरेदी द्वारे मोबदला मिळाला आहे. परंतु 25 च्या वर शेतकऱ्यांची जागा ओलीत असतानाही जिराईत दाखवून, काही शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर, घरे, फळझाडे असताना सुद्धा संपादन करतेवेळी ते सोडण्यात आले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचा कमी मोबदला मूल्यमापन करण्यात...