मुसळधार पावसामुळे सोमवारी वेकोलच्या वणी परिसरातील निलजई कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला. उकाणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला ओबी (ओव्हर बर्डन) ढिगारा अचानक कोसळला. मातीचा ढिगारा रस्त्यावर इतक्या वेगाने पसरला की एक स्कॉर्पिओ आणि तेथून जाणारा ट्रक त्यात पूर्णपणे अडकला गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि त्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.