घोडसगाव या गावापासून मार्गस्थ होणाऱ्या मलकापूर मुक्ताईनगर हायवे वर जावेद खान असलम खान पठाण वय ४० हा चालक दारूच्या नशेत भरधाव वेगात एसटी बस क्रमांक एम.एच.१४ एल. एक्स. ६३१७ घेऊन जात होता त्याने एका अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.