नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर संबधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदु समाज आक्रमक झाला आहे.सकल हिंदू समाजाकडून दि.११ सप्टेंबर दुपारी १२ वाजता नळदुर्ग शहर बंद ठेवुन शहरातुन मुक मोर्चा काढला पुढील तीन दिवसात दोषीवर कारवाई न झाल्यास १५ तारखेपासून नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.