अकोला येथील MIDC व्यापारी सुफीयान खान याची निर्जनस्थळी हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत ६ आरोपींना वाहनासह अटक केली. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुफीयानवर ४ अनोळखी इसमांनी चाकूने हल्ला करून त्याचा खून केला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके व पथकाने अकोला व शेगाव येथून आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील त