बीड ते मांडवा या मार्गावर रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अचानक रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळून आल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार टिपला. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून परिसरात चर्चा रंगली आहे. यामुळे बीड–मांडवा मार्गावरील नागरिक तसेच प्रवाशांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन होत आहे.