उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) च्या अंमलबजावणीच्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेची सर्रास लूट होत असल्याचा गंभीर आरोप आज दि 21 आगस्ट ला 12 वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात एचएसआरपीसाठी इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट शुल्क आकारले जात असताना , केंद्र सरकार याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला. या विषयावर त्यांनी लोकसभेत प्रश्न विचारून सरकारची पोलखोल केली आहे.