नांदूर नाक्यावर निमसे व धोत्रे गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.नांदूर नाका परिसरात हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर जखमी झाला आहे.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.नांदूर नाका येथे सनी धोत्रे उभा असताना पवन निमसे यांच्या दुचाकीचे चाक सनीच्या पायावरून गेले.यावेळी सनी व पवन यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.