गणेशोत्सवाच्या विसर्जन दरम्यान वरोरा नगरपालिकेने गांधीसागर तलावावर विसर्जनासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे. यावर्षीही सर्व मंडळांना सोयीस्कर व स्वच्छ परिसरात विसर्जन करता यावे यासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाखा शेळके यांनी आज दि 7 सप्टेंबर ला 5 वाजता स्वत: जाऊन तलावाची पाहणी केली होती.या निमित्ताने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाखा शेळके यांनी विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर येथील गणपतीच्या आरतीत सहभाग घेतला.