देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर परिसरातील तब्बल १५० एकर क्षेत्रात उभे असलेले सोयाबीन व कपाशीचे पीक “लुडो या क्रॉप केमिकल्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशकामुळे जळून खाक झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने या कंपनीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश बकाने यांनी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांच्या पुढाकाराने देवळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, उप