वडकी पोलिस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलिस चालक म्हणून प्रतीक्षा प्रवीण कोल्हे हिच्या नावे हा रेकॉर्ड तयार झाला आहे. यामुळे आता अनेक मुलींसाठी ती रोल मॉडेल (प्रेरणास्थान) बनली आहे. आम्ही खाकी परिधान करतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे नव्याने रुजू झालेल्या महिला चालक प्रतीक्षा कोल्हे यांनी आज दि 29 ऑगष्ट रोजी पब्लिक न्यूज शी बोलताना म्हटले.