ईद मिलाद उन्नबी पैगाम हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस रूपात साजरा करण्यात येतो. यानिमित्त शहरात भव्य जुलूस काढण्यात आला .युवक, पुरुष ,लहान मुले सुंदर वस्त्र परिधान करून हातात हिरव्या रंगाचे चांद तारा काढलेले झेंडे घेऊन पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या नावाचा जयघोष करीत शहरातून मुख्य रस्त्याने होत चुलुस काढण्यात आला .यावेळी शहरात अनेक गणेश मंडळांनी जुलूस मध्ये सामील झालेल्या मुस्लिम बांधवांसाठी चहा, नाश्ता ,पाण्याची व्यवस्था केली होती. शहरात हिंदू मुस्लिम बांधवांची एकता यावेळी पहावयास मिळाली.