महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जमिनीवर खाली पाडून त्यातील तांब्याची तार चोरणारी टोळी कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाली असल्याचे समोर आले आहे सातारारोड येथे ट्रान्सफॉर्मरमधून तीस हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीस गेली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारारोड पोलीस दुरक्षेत्रातून शुक्रवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा सातारारोड गावच्या हद्दीत गंथाडी वस्तीनजीक चोरीची घटना घडली.