अंबड भागात सदाशिवनगर येथे बिल्डिंगचे बांधकाम ठिकाणी प्लास्टर करत असताना विजेच्या वायरचा झटका लागल्याने 35 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात वृत्तीची नोंद करण्यात आली आहे.इमरान गुलाब हुसेन शेख राह.अशोका मार्ग हे सदाशिव नगर,सदाशिव निवास,अंबड या ठिकाणी बिल्डिंगचे प्लास्टर करत असताना विजेच्या वायरला धक्का लागला.यात विजेचा तीव्र झटका लागल्याने ते बेशुद्ध झाले. औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.