औसा- प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य धारण केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या आवसा बस स्थानकाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे औसा बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीच्या विळख्यात सापडलेल्या बस स्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे येथील बस स्थानकाच्या प्रवेश दारापासून तसेच बसेस बाहेर निघण्याच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत बसस्थानकामध्ये येणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस खडखड करीत आदळ आपट करीत बाहेर पडतात.