तुमसर शहरातील जुना बस स्टॉप चौकात मोटरसायकलच्या डिक्की मध्ये ठेवलेले 25 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 12 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी ज्ञानेश्वर गोविंद फुसे रा. नरसिंह टोला देव्हाडा यांनी आपल्या मोटरसायकल क्र. MH 36 J 39 89 च्या डिक्की मध्ये 25 हजार रुपये ठेवले असता अज्ञात आरोपींनी डिक्की मधून 25 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.