इचलकरंजी शहरातील डेक्कन मिल समोरील रस्त्यावर शुक्रवार,दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास चेतक मोटारसायकलला अचानक आग लागल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,डेक्कन मिलसमोरील मुख्य रस्त्यावर एक चेतक गाडी उभी असताना अचानक त्यातून धूर येऊ लागला.काही क्षणांतच संपूर्ण गाडीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला.