सेलू तालुक्यातील लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात 2 दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने प्रकल्पाचे 1 आणि 20 क्रमांकाचे दरवाजे 10 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत. धरणाची पाणी पातळी लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग कमी, जास्त केला जाऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहे.