एरंडोल ते म्हसावत जाणाऱ्या रस्त्यावर निखिल पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ डी.ए.७७०८ द्वारे संजय माणिक पवार वय ६० हे जात होते त्यांच्या दुचाकीला दुचाकी क्रमांक एम. एच.१९ ई.ई. ३७७२ वरील चालक संजय नामदेव कोळी यांनी धडक दिली. या अपघातात पवार हे ठार झाले. तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.