सावदा शहरापासून रेल्वे मार्ग मार्गस्थ होतो. येथे सावदा अपसाईड के एम ४५८/०१ ते ४५८/०५ दरम्यानच्या रेल्वे रूळवर धावत्या रेल्वेतून ४० वर्षीय इसम कोसळला होता. याची माहिती पोलिसांना ट्रॅकमॅन नितीन तायडे यांनी दिली. सावदा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्याला रुग्णालयात नेले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.