मराठा क्रांती योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षण घेतल्या शिवाय हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातून मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत जाणार आहेत. तसा निर्णय सोमवारी सकाळी अकरा वाजता घेण्यात आला. कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे मराठा क्रांती मोर्चा कोरेगाव तालुका समन्वय समितीची बैठक झाली.