आग लागून नुकसान झालेल्या इंदापूरमधील व्यावसायिकांना मंत्री भरत गोगावले यांनी मदतीचा हात पुढं केलाय. तीन व्यावसायिकांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर एकाला २५ हजार रुपयांची रोख मदत करून मंत्री गोगावले यांनी दिलासा दिलाय. इंदापूर बाजार पेठेतील इमारतीत शॉर्ट सर्किट मुळे आग लागून या व्यावसायिकांचे मोठं नुकसान झालं आहे. भरत गोगावले यांनी तिथं प्रत्यक्ष भेट देऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय.