आज बुधवार रोजी तालुक्यातील वरुळ जऊळका पुंडा यांसह अनेक भागांना ढगफुटी सदृश्य पावसाचा जोरदार तडाखा बसला यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र गणरायाच्या आगमगनाची लगबग असतानाच सकाळी 11 वाजता पासून ते दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदारपणे झोडपून काढले यामुळे तालुक्यातील खारपाणपट्ट्या भागांमध्ये विशेषतः पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.