कुरुंदवाड परिसरातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शहर आणि लगतच्या परिसरात पूरस्थिती गंभीर बनली आहे.रात्रीपासून सुमारे तीन फूट पाणी वाढल्याने काही भागांत पाणी थेट नागरी वस्तीत शिरले आहे.या पार्श्वभूमीवर गोठणपूर परिसरातील २१ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून सुमारे २०० जनावरेही हलवण्यात आली आहेत. कुरुंदवाड पालिका प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ कृती करत नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा दिल्या आहेत.