जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी पंचायतराज अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपला जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आज दि.12 सप्टेंबर ला 1 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करतांना ते बोलत होते.